
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं. भारताने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. असं असताना भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपकर्णधार स्मृती मंधानाला आणखी एक आयसीसी पुरस्कार जिंकण्याची संधी आहे. (Photo- PTI)

आयसीसीने सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकन यादीत तिला स्थान दिलं आहे. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी स्मृती मंधानाला नामांकन मिळाले आहे. विश्वचषकात सर्व सामने खेळणाऱ्या स्मृती मंधानाने एकूण 434 धावा केल्या. (Photo- PTI)

स्मृती मंधानासह दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड आणि ऑस्ट्रेलियाची एश गार्डनर यांनाही ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पण खरी लढत ही स्मृती आणि लॉरा यांच्यात असणार आहे.. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मानधनाने गेल्या महिन्यात प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता. आता तिला या वर्षी दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकण्याची संधी आहे. आता आयसीसी पुरस्काराचा मान दुसऱ्यांदा स्मृतीला मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- PTI)

स्मृती मंधाना बऱ्याच काळापासून एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. पण 811 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. (Photo- PTI)