IPL 2024, MI vs RR : युझवेंद्र चहलचा आयपीएलमध्ये मोठा कारनामा, अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

| Updated on: Apr 22, 2024 | 8:33 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण चार गडी झटपट बाद झाल्याने दडपण वाढलं. मोहम्मद नबीची विकेट घेत युझवेंद्र चहलने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

1 / 5
आयपीएलच्या 17 व्या पर्वात युझवेंद्र चहलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या सामन्यात युझवेंद्र चहलच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. युझवेंद्र चहलने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

2 / 5
युझवेंद्र चहल आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल हा पहिला गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणीही केलेली नाही.

3 / 5
युझवेंद्र चहल आयपीएल 2013 पासून खेळत आहे. य़ुझवेंद्र चहलचा आयपीएलमधला 153वा सामना आहे. मोहम्मद नबीची विकेट घेत त्याने 200 विकेट्सचा टप्पा गाठला आहे.

4 / 5
युझवेंद्र चहलने आयपीएलच्या या पर्वातही चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत 8 सामने खेळत 13 विकेट्स घेतल्या आहेत. युझवेंद्र चहल 13 विकेट्सह दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने 200 विकेट्स, ड्वेन ब्रावोने 183, पियुष चावलाने 181, भुवनेश्वर कुमारने 174 आणि अमित मिश्राने 173 विकेट्स घेतल्या आहेत.