पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक यांच्याबाबत मोठा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हकबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने या दोन्ही खेळाडूंवर कारवाई केल्याने अडचणीत वाढ झाली आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याचं पुढची वाटचाल बिकट झाली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघातील मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. इंग्लंड दौऱ्यातून त्यांना पुन्हा पाठवलं होतं. आता दोन्ही खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड 1 स्पर्धेत भाग घेणार आहे. (PHOTO CREDIT- GETTY/PTI)
मिडिया रिपोर्टनुसार, पीसीबीने या स्पर्धेपूर्वी खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करणं आणि त्याचा रिपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. मोहम्मद रिझवानने आणि इमाम उल हकने फिटनेस टेस्ट दिली नाही. त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)
मोहम्मद रिझवान एसएनजीपीएलचा उपकर्णधार होता आणि नियमित कर्णधार शान मसूदच्या अनुपस्थितीत त्याला संघाची जबाबदारी घ्यावी लागली. दरम्यान, इमाम-उल-हकची ओजीडीसीएलच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आता दोन्ही संघांना आपापल्या कर्णधारांशिवाय मैदानात उतरावे लागत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)
राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेकडून दोन्ही खेळाडूंची चौकशीही सुरू आहे. लंडनमध्ये जप्त करण्यात आलेल्या खेळाडूंच्या मोबाईल फोनचे पीसीबी तांत्रिक आणि फॉरेन्सिक विश्लेषण करत आहे. तपास यंत्रणा इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणि नंतर खेळाडूंच्या बँक खात्यातील व्यवहारांची बारकाईने तपासणी करत आहे. (PHOTO CREDIT- GETTY)
इंग्लंड दौऱ्यातून या दोन्ही खेळाडूंना अचानक वगळण्यामागे लॉर्ड्स कसोटी हे कारण आहे. त्या सामन्यात मोहम्मद रिझवान फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला होता. दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला फक्त 61 धावा करता आल्या. तर इमाम-उल-हकने पोटरीच्या दुखापतीचे कारण देत मैदान सोडले होते. वेगवान गोलंदाजांचा सामना टाळण्यासाठी त्याने दुखापतीचे नाटक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. (PHOTO CREDIT- PTI)