IND vs ENG : मोहम्मद शमीला दुखापत की डच्चू? निवड समिती प्रमुख आगरकर यांनी थेटच सांगितलं

Mohammed Shami Team India : टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली नाही.

| Updated on: May 24, 2025 | 6:54 PM
1 / 5
बीसीसीआयने शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संधी मिळाली नाही. शमीला संधी का दिली गेली नाही? याबाबत  निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कारण सांगितलंय. (Photo Credit : Gareth Copley-ICC/ICC via Getty Images)

2 / 5
मोहम्मद शमी जवळपास गेल्या 2 वर्षांपासून टीममधून बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC फायनल हा शमीचा अखेरचा कसोटी सामना होता. त्यानंतर शमीला दुखापतीमुळे कमबॅक करता आलं नाही. (Photo Credit : PTI)

3 / 5
शमी तेव्हापासूनच फिटनसेवर जोरदार मेहनत घेऊ लागला. शमी देशांतर्गत क्रिकेटही खेळला. शमी आयपीएलच्या 18 व्या मोसमातही खेळला. मात्र शमीने निराशा केली. शमीने 18 व्या हंगामात एकूण 9 सामन्यांमध्ये 56.17 च्या सरासरीने आणि 11.23 च्या इकॉनमी रेटने 9 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : PTI)

4 / 5
शमीला संधी न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शमीला वगळण्यात आलं की त्यामागे काही दुसरं कारण आहे? असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला. मात्र आगरकर यांनी शमीला संधी न देण्यामागील कारणही सांगितलं. (Photo Credit : PTI)

5 / 5
" शमीला गेल्या काही आठवड्यांपासून काही समस्या आहेत. काही एमआरआय करण्यात आले आहेत. तो सध्या 5 कसोटी सामने खेळू शकत नाही. त्याच्यावर जितका भार असायला हवा होता तितका नाही. आम्हाला आशा होती की तो उपलब्ध असेल. मात्र दुर्दैवाने तो फिट नाही", असं आगरकर यांनी स्पष्ट केलं. (Photo Credit : PTI)