आता फक्त DSP नाही, तर ‘कॅप्टन’! मोहम्मद सिराजकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा

मोहम्मद सिराज भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने अनेकदा टीम इंडियाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं आहे. असं असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये कधीही कर्णधारपद भूषवलं नाही. आता ही जबाबदारीही त्याच्याकडे आली आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 5:36 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज क्रिकेटविश्वात डीएसपी नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्याला हैदराबाद पोलील दलाने या रँकवर नियुक्त केलं आहे. पण आता मोहम्मद सिराज फक्त डीएसपी राहिलेला नाही. (Photo: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज क्रिकेटविश्वात डीएसपी नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्याला हैदराबाद पोलील दलाने या रँकवर नियुक्त केलं आहे. पण आता मोहम्मद सिराज फक्त डीएसपी राहिलेला नाही. (Photo: PTI)

2 / 5

हैदराबादचा स्टार गोलंदााज मोहम्मद सिराजला नवी ओळख मिळाली आहे. मोहम्मद सिराजच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने ही जबाबदारी सोपवली आहे. (Photo: PTI)

3 / 5

देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी हैदराबाद संघाची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या पर्वापासून मोहम्मद सिराज पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे. याची सुरूवात होम टीमपासून होणार आहे. (Photo: PTI)

4 / 5

मोहम्मद सिराजसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. कारण या माध्यमातून त्याला दोन हेतू साध्य करता येणार आहेत. पहिलं तर न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी फॉर्म मिळवण्यास मदत होईल. दुसरं संघाचं नेतृत्व सांभाळण्याची संधी मिळेल. (Photo: PTI)

5 / 5

मोहम्मद सिराज श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग होता. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत साउथ झोन संघाकडून खेळला. पण त्याचा गोलंदाजीचा तसा प्रभाव पडला नाही. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us