IPL 2024 | मुंबई इंडियन्सचे 5 शिलेदार सहाव्यांदा ट्रॉफी जिंकवण्यासाठी सज्ज

| Updated on: Mar 19, 2024 | 5:13 PM

Mumbai Indians IPL 2024 | रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएलमध्ये चॅम्पियन केलं. आता कॅप्टन बदललाय. हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे. अशात आता मुंबई आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा षटकार लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

1 / 5
रोहित शर्मा यंदा कॅप्टनऐवजी खेळाडू म्हणून खेळणार आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने आयपीएलमध्ये 6 हजार 211 धावा केल्या आहेत. रोहितने 16 व्या मोसमात 332 धावा केल्या होत्या. यंदा रोहितकडे कॅप्टन्सीची अतिरिक्त जबाबदारी नाही. त्यामुळे रोहितकडून आणखी आक्रमक फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

2 / 5
सूर्यकुमार यादव गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मात्र त्याची चौफेर फटकेबाजी क्रिकेट विश्वाला माहित आहे. सूर्याने आयपीएलमध्ये 3 हजार 249 धावा केल्या आहेत. सूर्याने आयपीएलमध्ये 1 शतकही ठोकलंय. सूर्याकडून यंदा तडाखेदार कामगिरीची अपेक्षा मुंबईच्या चाहत्यांना असणार आहे.

3 / 5
हार्दिक पंड्या याची 2 वर्षांनंतर मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झालीय. 2022 आणि 2023 साली हार्दिकने गुजरातचं नेतृत्वं केलं.  त्यानंतर यंदा मुंबईने ट्रेडद्वारे हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं. हार्दिकच आता मुंबईचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक ऑलराउंडर आहे. त्यामुळे हार्दिकवर बॅटिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सी अशी तिहेरी भूमिका असणार आहे.

4 / 5
ईशान किशनही आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे. ईशान गेली अनेक महिने टीम इंडियापासून वैयक्तिक कारणामुळे दूर आहे. मात्र आता तो परतलाय. ईशान टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. ईशानने आतापर्यंत आयपीएलमध्ये 2 हजार 324 धावा केल्या आहेत. ईशानने गत मोसमात 454 धावा केल्या होत्या. आता अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर ईशान कशी कामगिरी करतो, याकडे निवड समितीचंही लक्ष असणार आहे.

5 / 5
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचं दीर्घ काळानंतर आयपीएलमध्ये कमबॅक होत आहे. बुमराहला 2023 मध्ये दुखापतीमुळे खेळता आलं नाही. मात्र त्यानंतर बुमराहने आयर्लंड दौऱ्यातून कमबॅक केलं आणि आतापर्यंत विविध मालिकांमध्ये टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. बुमराहच्या नावावर आयपीएलमध्ये 145 विकेट्स आहेत.