
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या एफबीके स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नीरजने 4 जून रोजी नेदरलँड्समधील हेन्जेलो येथे होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स-कोहेन गेम्समधून माघार घेतली आहे.अधिकृत ट्विटर खात्यावर स्नायूंच्या दुखण्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून माघार घेतल्याचं सांगितलं आहे.

मला सरावाच्या वेळी स्नायूंचा त्रास झाला होता, वैद्यकीय तपासणीनंतर मी खबरदारीचा उपाय म्हणून एफबीके गेम्समधून माघार घेत आहे, असं नीरजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे.

सुवर्णपदकाने नीरज चोप्राने वर्षाची सुरुवात केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भालाफेक करून पदक जिंकले होते.

दुखापतींनी त्रस्त असलेला 25 वर्षीय नीरज जूनमध्ये फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पाओ नूरमी गेम्सद्वारे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.