टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकन फलंदाजांच्या नावावर मोठा विक्रम, आतापर्यंत अशी कामगिरी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरी गाठली आहे. आता सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेचा सामना भारताशी होणार आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकन फलंदाजांची कामगिरी डोळ्यात अंजन घालणारी आहे. भारत आणि इटलीने या स्पर्धेत नको ती कामगिरी केली आहे.

| Updated on: Feb 21, 2026 | 10:15 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला. त्यापैकी  12 संघांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आता आठ संघ सुपर 8 फेरीत लढत देणार आहेत. असं असताना साखळी फेरीतील 40 सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या नावावर दुर्मिळ विक्रम नोंदवला गेला आहे. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. (Photo: Proteas Men Twitter)

2 / 5

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिका हा एकमेव संघ असा आहे की, त्यांचा एकही फलंदाज शून्यावर बाद झालेला नाही. म्हणजेच इतर 19 संघातील कोणता कोणता फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे. भारत आणि इटली यात आघाडीवर आहेत. (Photo: Proteas Men Twitter)

3 / 5

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. भारतीय संघाती फलंदाज 8 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यात अभिषेक शर्मा तीनवेळा खातं न खोलता बाद झाला. भारताप्रमाणे इटलीच्या फलंदाज 8 वेळा भोपळा न फोडता बाद झाले आहेत. (Photo- PTI)

4 / 5

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीवर अभिषेक शर्मा नको त्या पंगतीत बसला आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध त्याला खातंही खोलता आलं नाही. या पर्वात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेला फलंदाज आहे. (Photo- PTI)

5 / 5

दक्षिण अफ्रिकेची या स्पर्धेतील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आता भारताचं आव्हान असून विजयी घोडदौड कायम ठेवतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आफ्रिकन संघ आता सुपर ८ मध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचा सामना करेल. (Photo: Proteas Men Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us