NZ vs BAN : केन विलियमसन याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता काय केलं ते वाचा
NZ vs BAN : न्यूझीलंडची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. तर कर्णधार केन विलियमसन याने विक्रमांची नोंद केली आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 11 वा सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. बांगलादेशने फलंदाजी करत 50 षटकात 9 गडी गमवून 245 धावा केल्या. न्यूझीलंडने हे लक्ष्य 2 गडी गमवून 42.5 षटकात पूर्ण केलं. (Photo- Twitter)

न्यूझीलंडने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. यासह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचे 6 गुण झाले असून फक्त सामने जिंकताच उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होणार आहे. (Photo- Twitter)

न्यूझीलंडला डेवॉन कॉनव्हे आणि केन विलियमसन यांची चांगली भागीदारी केली. डेवॉन कॉनव्हेनं 45, तर कर्णधार केन विलियमसननं 78 धावा केल्या. (Photo- Twitter)

विलियमसन रिटायर्ड हर्ट झाला. विलियमसनने सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. विलियमसनने आयपीएल 2023 मध्ये क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. (Photo- Twitter)

विलियमसन या सामन्यात काही विक्रम नोंदवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. (Photo- Twitter)

आयसीसीच्या लिमिटेड षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक 50 हून अधिक धावा करण्याचा मान त्याला मिळाला आहे. दुखापतीमुळे विलियमसन सुरुवातीचे दोन सामने खेळला नव्हता. (Photo- Twitter)