T20 WC: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझमची कमाल, 32 चेंडूत पहिल्यांदाच केल्या इतक्या धावा

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 12व्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या. यात बाबर आझमच्या खेळीची चर्चा होत आहे.

| Updated on: Feb 10, 2026 | 10:01 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान दुसऱ्या विजयाच्या वेशीवर आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेसमोर विजयासाठी 190 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात पाकिस्तान स्टार फलंदाज बाबर आझमला सूर गवसल्याचं दिसून आलं. (फोटो- PTI)

2 / 5
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्याच्या या खेळीचं महत्त्व काही वेगळं आहे. गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या स्ट्राईक रेटवर टीका होत आहे. पण या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. (फोटो- PTI)

3 / 5
बाबर आझमने टी20  विश्वचषकातील त्याची सर्वात वेगवान खेळी खेळली. अमेरिकेविरुद्ध बाबरने फक्त 32 चेंडूत 46 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. पण त्याचं अर्धशतक फक्त चार धावांनी हुकलं.  (फोटो- PTI)

4 / 5
बाबर आझमने पहिल्या 18 चेंडूत फक्त 15 धावा केल्या होत्या. यात एकही चौकार किंवा षटकार नव्हता. पण त्यानंतरच्या 14 चेंडूत त्याने 31 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकार मारला.  (फोटो- PTI)

5 / 5
बाबर आझमचा स्ट्राईक रेट सुरूवातीला कमी होता.पण त्याने वेग वाढवला आणि 143.75 पर्यंत पोहोचला. यापूर्वी बाबर आझमने टी20 विश्वचषकात कधीही या स्ट्राईक रेटने धावा केल्या नव्हत्या. बाबरची सर्वात वेगवान खेळी 142.85 स्ट्राईक रेटची होती. त्याने 2021 मध्ये नामिबियाविरुद्ध खेळला होता. (Photo: Getty Images)