
मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाज नोमान अलीने विक्रम केला आहे. हॅटट्रीक घेत नोमान अलीने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. यासह ही कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.

वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागले. कारण वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 163 धावांवर बाद झाला.

नोमान अलीने आपल्या फिरकीने गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. आता जस्टिन ग्रीव्हज (1), टेविन इम्लाच (0) आणि केविन सिंक्लेअर (0) यांचे बळी घेत पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. पाकिस्तानसाठी कसोटीत हॅटट्रीक घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.

पाकिस्तानकडून कसोटीत हॅटट्रीक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी वसीम अक्रम (1999), अब्दुल रझाक (2000), मोहम्मद सामी (2002), नसीम शाह (2020) यांनी ही कामगिरी केली होती. आता फिरकीपटू नोमान अलीने या यादीत प्रवेश केला आहे.

नोमान अलीने हॅटट्रीकसह एकूण सहा विकेट घेतले. 15.1 षटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले. यात त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. त्याचा इकोनॉमी रेट हा 2.70 इतका होता.