Babar Azam : बाबर आझम याच्याकडून विराट विक्रमाची बरोबरी, आता नंबर 1 होण्याची संधी

Babar Azam Eqaual World Record : बाबर आझम गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. बाबरने काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यानंतर आता बाबरने विराट कोहली याच्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली होती.

| Updated on: Nov 24, 2025 | 6:46 PM
1 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला गेली काही महिने धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र आता बाबरने कमबॅक केलं आहे. बाबरने गेल्या काही सामन्यांमधून जोरदार कमबॅक केलं आहे. बाबरने टी  20 क्रिकेटमध्ये कडक कामगिरी करत भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
पाकिस्तान, झिंबाब्वे आणि श्रीलंका यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. बाबरने या मालिकेतील चौथ्या सामन्यात धमाका केला. बाबरने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला 195 धावांपर्यंत  पोहचवलं. (Photo Credit: PTI)

3 / 5
बाबरने 52 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. बाबरचं हे टी 20  कारकीर्दीतील 38 वं अर्धशतक ठरलं. बाबरने यासह विराटच्या टी 20i अर्धशतकांच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. (Photo Credit: PTI)

4 / 5
बाबरने अवघ्या काही दिवसांपूर्वी टी 20i क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला होता. बाबर यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोहितने 151 डावांत 4 हजार 231 धावा केल्या. तर बाबरने आतापर्यंत 127 डावांत 4 हजार 392 धावा केल्या आहेत. (Photo Credit: PTI)

5 / 5
पाकिस्तानने या सामन्यात झिंबाब्वेवर 69 धावांनी मात केली. बाबर व्यतिरिक्त साहिबजादा फरहान याने 63 धावा केल्या. तर फखर जमा याने 27 धावा केल्या. तर उस्मान तारीक याने हॅटट्रिकसह एकूण 4 विकेट्स घेतल्या.  (Photo Credit: PTI)