
पाकिस्तानचा क्रिकेटर आणि दमदार गोलंदाजी करणारा मोहम्मद हसनैन याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तो पाकिस्तानच्या टीमसोबत दिसो ना दिसो. तो सध्या तरीही चर्चेत आहे. त्याच्यावर एक अभिनेत्री फिदा झाली आहे. तिनं फिदा होण्याचंही कारणंही सांगितलंय.

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हसनैन याच्यावर फिदा होणारी अभिनेत्री मरियम नफीस ही आहे. नफीस हसनैनवर फिदा झाली अन् तिनं त्याचं कारणही दिलं आहे. तिनं हसनैनचं प्राणीप्रेम पाहिलंय.

आशिया चषकादरम्यान पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात हसनैन एका मांजरीसोबत खेळताना दिसत आहे. तो मांजरीला दूध पाजतानाही दिसत आहे. हाच फोटो इन्स्टावर शेअर करत आपल्याला अशाच लोकांची गरज आहे, असं मरियमनं म्हटलंय.

आशिया चषकादरम्यान उर्वशी रौतेला आणिनसिम शाह चर्चेत होते. यावेळी देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.

मरियम हसनैनवर फिदा असली तरी ती त्याचं प्राणीप्रेम पाहून त्याच्यावर फिदा आहे. मरियम देखील सामाजिक काम करते.