आयपीएल स्पर्धेत प्रियांश आर्यचा झंझावात, इशान किशननंतर नोंदवलं दुसरं शतक

इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. पंजाब किंग्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रियांश आर्यने स्पर्धेतलं दुसरं शतक झळकावलं.

| Updated on: Apr 08, 2025 | 9:12 PM
1 / 5
प्रियांश आर्यने 42 चेंडूत 103 धावांची आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. एका बाजूला धडाधड विकेट पडत असताना त्याचा झंझावात सुरु होता. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पंजाब किंग्सने 219 धावांपर्यंत मजल मारली.

2 / 5
प्रियांश आर्यने फक्त  39 चेंडूत शतक पूर्ण केलं. इशान किशननंतर या स्पर्धेत शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा आक्रमक बाणा दाखवला आणि अर्धशतक पूर्ण केलं.

3 / 5
आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा प्रियांश आर्य हा आठवा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. याआधी शॉन मार्श (2008), मनीष पांडे (2009), पॉल वल्थाटी (2009), देवदत्त पडिक्कल (2021), रजत पाटीदार (2022), यशस्वी जैस्वाल (2022) आणि प्रभसिमरन सिंग (2023) यांनी अशी कामगिरी केली आहे.

4 / 5
पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 50 हून अधिक धावा करणारा  दुसरा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याच्या आधी सनी सोहेल (2011) ने असा पराक्रम केला आहे.

5 / 5
दिल्ली प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत प्रियांश आर्यचा झंझावात पाहायला मिळाला होता. त्याने एक षटकात सहा षटकार मारले होते. तसेच आक्रमक शतकही पूर्ण केलं होतं. मेगा लिलावात 30 लाखांच्या बेस प्राईसवर उतरला होता. पंजाब किंग्सने 3.8 कोटी रुपये बोली लावली. (सर्व फोटो- IPL/PBKS Twitter)