
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आज 8 जून रोजी विवाहबद्ध झाला आहे. प्रसिद्धने गर्लफ्रेंड रचना कृष्णा हीच्याशी लग्न केलं आहे. प्रसिद्धच्या लग्नाला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली.

प्रसिद्ध कृष्णाने हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. याआधी 2 दिवसांपूर्वी 6 जून रोजी प्रसिद्धचा साखरपुडा पार पडला.

प्रसिद्धच्या लग्नाला टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. प्रसिद्धच्या लग्नाला जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडू हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्धची पत्नी रचना ही बिजनेस वूमन आहे.

प्रसिद्ध आणि रचना या दोघांचा लग्नात ट्रेडिश्नल अंदाज पाहायला मिळाला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.