अर्शदीप सिंगने एकच चूक केली 19 वेळा, आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात नकोशी कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलग विजयानंतर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा विजयी रथ रोखला. पंजाब किंग्सच्या पहिल्या पराभवात अर्शदीप सिंगची गोलंदाजी कारणीभूत ठरली. कसं काय ते समजून घ्या.

| Updated on: Apr 29, 2026 | 5:13 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सला पहिल्या पराभवाचा धक्का बसला. या पर्वात पंजाब किंग्सने सात सामने खेळले असून एकही सामना गमावला नव्हता. पण आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मात दिली.  त्यामुळे   या हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही पंजाब किंग्सला रोखता आलं नाही. या सामन्यात गोलंदाजीची कमकुवत बाजू उघड झाली. यात स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
पंजाब किंग्सच्या आतापर्यंतच्या विजयात खऱ्या अर्थाने फलंदाजी भक्कम ठरली. राजस्थान रॉयल्सविरुद्धही पंजाबच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजी कमकुवत होण्याची सततची भीती यावेळी खरी ठरली आहे.अर्शदीप सिंग या पर्वात काही खास गोलंदाजी करू शकलेला नाही. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि मार्को यानसेन हे तिन्ही वेगवान गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. विशेषतः अर्शदीप पूर्णपणे अपयशी ठरला. राजस्थानविरुद्धचार षटकांत राजस्थानने 68 धावा दिल्या.  अर्शदीप सिंग प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला आहे. त्याने या पर्वातील आठ सामन्यांमध्ये केवळ 8 बळी घेतले आहेत. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
अर्शदीप सिंगने इकॉनॉमी रेट ही देखील एक चिंतेची बाब आहे. अर्शदीपने 10.96 च्या महागड्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. वाईड बॉल टाकण्याच्या क्रमवारीत अर्शदीप अव्वल स्थानी आहे. त्याने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत 19 वाईड बॉल टाकले आहेत. (Photo: IPL/BCCI)

Follow Us