
इंग्लंडने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात धर्मशालेत टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 आणि इंग्लंडने 1 बदल केलाय.

इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो आणि टीम इंडियाचा आर अश्विन दोघांसाठी हा सामना ऐतिहासिक असा आहे. या दोघांच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी दोघांचं अभिनंदन केलं जात आहे.

आर अश्विन हा टीम इंडियाकडून 100 वा कसोटी सामना खेळणारा एकूण 14 वा भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन भारतासाठी 100 सामने खेळणारा चौथा गोलंदाज ठरलाय.

टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी सामन्याआधी आर अश्विन याला 100 व्या कसोटीनिमित्ताने खास कॅप दिली. अश्विन या वेळेस आपल्या कुटुंबासह उपस्थित होता.

आर अश्विन याने या ऐतिहासिक क्षणी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीला उजाळा दिला. यावेळेसइतर सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

आर अश्विन याच्या 100 व्या कसोटी निमित्ताने राजस्थान रॉयल्स टीमने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टीम इंडियासाठी 100 कसोटी सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या फोटोत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आर अश्विनचं 100 टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये स्वागत करत आहेत. हा फोटो तयार करण्यात आला आहे.