रशीद खानचा थरकाप! अभिषेक शर्माने फिरकीच्या जादुगाराला रडवलं; अवघ्या काही चेंडूंत कुटल्या 101 धावा
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही अभिषेक शर्मा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला. त्याने अवघ्या 32 चेंडूंमध्ये 82 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार मारले होते.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा आणि जगातील सर्वोत्तम फिरकीपटू रशीद खान यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. (Photo: PTI)
रशीद खान हा संपूर्ण जगात त्याच्या फिरकीसाठी प्रसिद्ध असून अनेक दिग्गज फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर चाचपडतात. मात्र, जेव्हा अभिषेक शर्मा त्याच्यासमोर येतो, तेव्हा रशीदच्या फिरकीचा जादूई प्रभाव पूर्णपणे नाहीसा होतो. (Photo: PTI)
टी20 क्रिकेटच्या आकडेवारीनुसार, अभिषेक शर्माने रशीद खानच्या 43 चेंडूंचा सामना करताना तब्बल 101 धावा कुटल्या आहेत. रशीदसारख्या गोलंदाजाविरुद्ध अभिषेक शर्माची फलंदाजी नेहमीच वरचढ ठरली आहे. (Photo: PTI)
रशीद खानविरुद्ध फलंदाजी करताना अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट 234.88 इतका प्रचंड राहिला आहे. रशीदच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेगाने धावा चोपणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये अभिषेक अव्वल स्थानी आहे. (Photo: PTI)
रशीद खानला संपूर्ण टी20 कारकिर्दीत अभिषेक शर्माला केवळ एकच वेळा बाद करता आले आहे. रशीदविरुद्ध अभिषेकची सरासरी 101 ची आहे, तर त्याने आपल्या एकूण धावांपैकी 32.55 टक्के धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून केल्या आहेत. (Photo: PTI)