
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्का बसला आहे. स्टार खेळाडू एलिस पेरी आगामी पर्वात खेळणार नाही. पेरीने आरसीबीला स्पष्ट कळवलं की, ती आगामी हंगामात खेळणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे पेरीने हा निर्णय घेतला. (फोटो-Pankaj Nangia/Getty Images)

एलिस पेरीने 2024 मध्ये आरसीबीला महिला प्रीमियर लीग जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तिला आरसीबीने तिला या पर्वासाठी 2 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. (फोटो- PTI)

एलिस पेरीच्या निर्णयानंतर आरसीबीने आता तिच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे. 25 वर्षीय अष्टपैलू सायली सातघरे हिला तिच्या जागी करारबद्ध करण्यात आले आहे. तिने भारतासाठी तीन एकदिवसीय सामने आणि गुजरातसाठी चार आयपीएल सामने देखील खेळले आहेत. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

एलिस पेरीने महिला प्रीमियर लीगमध्ये 25 सामन्यांमध्ये 64.8 च्या सरासरीने 972 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राईक रेट 132 पेक्षा जास्त आहे. तिने आठ अर्धशतके देखील झळकावली आहेत. पेरीने 14 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तिचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 8.2 धावा आहे. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

एलिस पेरी सध्या फॉर्मात असून महिला बिग बॅश लीगमध्ये तिने सिडनी सिक्सर्ससाठी 10 सामन्यात 412 धावा केल्या. पेरीची सरासरी 51.5 होती आणि तिचा स्ट्राईक रेट 140 पेक्षा जास्त होता. या हंगामात पेरीने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)