
विराट कोहली आणि रोहित शर्मा


रोहितनंतर जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. विराटच्या नेतृत्वाखाली बुमराहने आयसीसी टूर्नामेंटमध्ये दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. विराटला स्वत: कर्णधार म्हणून खेळताना फक्त एकदाच आयसीसी टूर्नामेंटमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली शिखर धवन आणि युवराज सिंग यांनाही प्रत्येकी एकदा सामनवीर पुरस्कार मिळाला आहे.

2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्काराचा विचार केल्यास यामध्ये रोहित शर्मा आघाडीवर आहे. रोहितने यादरम्यान 12 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. हसनला 10 वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी नऊ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांना प्रत्येकी आठ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.