IND vs ENG: भारत इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात 967 दिवसानंतर असं चित्र पाहायला मिळणार, जाणून घ्या

India vs England, 1st ODI: टी20 मालिकेनंतर भारतीय संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून बर्मिंघम येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात पहिल्यांदाच काही वेगळं घडणार आहे. यापूर्वी 967 दिवसांपूर्वी असं घडलं होतं. आता वनडेत 32 महिन्यांनंतर असं होणार आहे.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:36 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 14 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात एक चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानात 967 दिवसांपासून किंवा 32 महिन्यांपासून असं पाहिलं नाही.  (Photo: PTI)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 14 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात एक चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानात 967 दिवसांपासून किंवा 32 महिन्यांपासून असं पाहिलं नाही. (Photo: PTI)

2 / 5

टीम इंडियासाठी 967 दिवसानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बर्मिंघम वनडे सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Photo: PTI)

3 / 5

रोहित-विराट आणि बुमराह हे भारताचे दिग्गज खेळाडू शेवटचा वनडे सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकत्र खेळले होते. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले होते. तेव्हा भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (Photo: PTI)

4 / 5

आता 967 दिवसानंतर हे तिन्ही एकत्र वनडे खेळणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग 11 मध्ये असणार यात काही शंका नाही. या तिकडीवर वनडे मालिका जिंकण्याचं आणि टी20 मालिकेतील अपयश पुसण्याची जबाबदारी असणार आहे. (Photo: PTI)

5 / 5

वनडे वर्ल्डकप 2023 नंतर हे तिघं एकत्र न खेळण्याची बरीच कारण आहेत. कधी दुखापत, तर कधी वर्क लोड मॅनेजमेंटमुळे हे तिघंही वनडे मालिकेत एकत्र खेळले नाहीत. पण पुढच्या तयारीसाठी या तिघांकडे पाहिलं जात आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us