IPL 2025 : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला एकामागून एक पाच धक्के, झालं असं की…

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबी प्लेऑफच्या वेशीवर आहे. आरसीबीने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला असून 16 गुणांची कमाई केली आहे. आता उर्वरित तीन पैकी एक सामना जिंकला की प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. पण आरसीबीची धाकधूक वेगळ्याच कारणासाठी वाढली आहे.

| Updated on: May 14, 2025 | 6:46 PM
1 / 7
आयपीएल 2025 स्पर्धा भारत पाकिस्तान तणावादरम्यान स्थगित करण्यात आली होती. आता 17 मे पासून या स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार आहे. शनिवार पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी आरसीबीचे दोन खेळाडू अनुपलब्ध असतील हे निश्चित आहे.

2 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्यामुळे उर्वरित स्पर्धेसाठी मुकला आहे. त्याच्या जागी संघात मयंक अग्रवालची निवड झाली आहे.

3 / 7
खांद्याच्या दुखण्याने त्रस्त असलेला जोश हेझलवूड देखील आरसीबी संघाच्या उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज प्लेऑफ फेरीतही दिसणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे.

4 / 7
आरसीबीचा सलामीवीर फलंदाज जेकब बेथेल देखील प्लेऑफ सामन्यात दिसण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी बेथेलला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तोही केकेआर आणि एसआरएच विरुद्धच्या सामन्यांनंतर घरी परतेल.

5 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाचा भाग असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी देखील 25 मे रोजी मायदेशी परतणार असल्याचे वृत्त आहे. जर आरसीबी प्लेऑफमध्ये प्रवेश करत असेल तर लुंगी एनगिडी या संघात नसेल.

6 / 7
रोमारियो शेफर्डला वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 29 मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्लेऑफ सामन्यापूर्वी रोमारियो शेफर्ड देखील आरसीबी संघ सोडणार असल्याचे वृत्त आहे.

7 / 7
प्लेऑफ फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं स्थान जवळपास निश्चित आहे. पण प्लेऑफमध्ये पाच खेळाडू अनुपलब्ध असतील हे जवळजवळ निश्चित आहे. या पाचही खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आरसीबी यावेळी चमकदार कामगिरी करेल आणि चषक जिंकेल का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)