काम शून्य, पण लाखोंचं मानधन! 7000 किमी प्रवास करून आलेल्या पाकिस्तानी खेळाडूवर झाली पैशांची बरसात

पाकिस्तानचा संघ तिसरा कसोटी सामना गमावणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आधीच फॉलोऑन मिळाला असून दोन विकेटही गमावल्या आहेत. या सामन्यासाठी पाकिस्तानने संघ बदलला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. यात सईम अयुबची कामगिरी निराशाजनक राहिली.

| Updated on: Sep 11, 2026 | 3:50 PM
1 / 5
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाची फलंदाजी डोकेदुखी ठरली आहे. या दौऱ्यात फलंदाजांना स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी बऱ्याच संधी मिळाल्या. पण प्रत्येक वेळी पदरी निराशा पडली. युवा ओपनर सईम अयुबच्या बाबतही असंच म्हणावं लागेल. त्याला संधी मिळाली पण वाईट कामगिरी करून गेला. (Photo: Getty Images)

2 / 5

बर्मिंघममध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानी संघात सईम अयुब यांची निवड केली होती. पण दोन्ही डावात सपशेल अपयशी ठरला. त्याला खातंही खोलता आलं नाही. (Photo: Getty Images)

3 / 5

कसोटी मालिकेपूर्वी सईम अयुब वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. पण तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला 7 हजार किमी दुरून इंग्लंडला बोलवलं गेलं. पण कसोटीत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याला दोन्ही डावात ओली रॉबिनसनने बाद केलं. (Photo: Getty Images)

4 / 5

इंग्लंडमध्ये शून्य कामगिरी करूनही सईम अयुबला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जवळपास सुमारे 15 लाख पाकिस्तानी रुपये (PKR) म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे साडेचार लाख रुपये मिळतील. (Photo: Getty Images)

5 / 5

सईम अयुबला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून निश्चित केलेली फी मिळणार आहे. एका कसोटीसाठी 15 लाख पीकेआर दिले जातात. त्यानुसार ही रक्कम त्याला मिळणार आहे. म्हणजेच शून्य कामगिरी करूनही लाखोंचं मानधन घेऊन जाईल. (Photo: Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us