यशस्वी जयस्वाल बाद होताच दोन दिग्गज खेळाडूंच्या जखमा झाल्या ताज्या, असंच काहीसं तेव्हा झालं होतं

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालकडे 200 धावा करण्याची मोठी संधी होती. पण एक चूक आणि डाव त्यापूर्वीच संपला. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर धावचीत होत तंबूत परतला. असंच दु:ख यापूर्वी भारताच्या दोन खेळाडूंनी अनुभवलं होतं.

| Updated on: Oct 11, 2025 | 6:23 PM
1 / 5
भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 175 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी काहीच प्रेशर नसल्याने आरामात 200 धावा करेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. स्वत:ची चूक नडली आणि धावचीत होत तंबूत परतला. त्यामुळे यशस्वीच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती.  (Photo-PTI)

2 / 5
यशस्वी जयस्वालचं दु:ख भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंना माहिती आहे. कारण ते देखील या परिस्थितीतून गेले आहेत. राहुल द्रविड आणि संजय मांजरेकर यांना असाच फटका बसला आहे. दोन्ही खेळाडू मोठी खेळी करूनही धावचीत होत तंबूत परतले होते. (Photo-PTI/Gareth Copley/Getty Images)

3 / 5
लाहोरमध्ये 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर 218 धावा करून बाद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद होण्यापूर्वी भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo-Getty Images)

4 / 5
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला देखील असाच फटका बसला होता. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत राहुल द्रविडने धावबाद होण्यापूर्वी 217 धावांची खेळी केली होती.  (Photo-Richard Heathcote/Getty Images)

5 / 5
राहुल द्रविड एकदा नाही तर दोन धावचीत झाला आहे. एकदा 217 धावा करून, तर एकदा 180 धावांवर धावचीत झाला होता. 2001 मध्ये कोलकात्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 180 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे सर्वोच्च धावसंख्या करून बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये संजय मांजरेकर आघाडीवर, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आणि चौथ्या स्थानावर आता यशस्वी जयस्वाल आहे. (Photo-Shaun Botterill/Getty Images)