सामनावीराचा मान मिळवण्यात संजू सॅमसन अव्वल, आयपीएल स्पर्धेदरम्यान दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे
आयपीएल 2026 स्पर्धेत सुरुवातीच्या काही सामन्यात संजू सॅमसनला सूर गवसला नाही. मात्र त्यानंतर त्याने चांगलीच लय पकडली. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच एक खास विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली आहे. या पर्वात संजू सॅमसनने दोन शतकं ठोकली आहे. इतकंच काय तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद 87 धावांची खेळी केली आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवताच संजू सॅमसन नंबर 1 झाला आहे. या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक प्लेयर ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळवले आहेत. (Photo: IPL/BCCI)

संजू सॅमसनसाठी हे वर्ष जबरदस्त चाललं आहे. टी20 क्रिकेटमध्ये पाच वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळावला आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा, तर आयपीएल स्पर्धेत तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)

संजू सॅमसनने इशान किशन, साहिबजादा फरहान, विल जॅक्स, फखर जमान आणि शेरफाने रूदरफोर्ड यांना मागे टाकलं आहे. या खेळाडूंनी या वर्षात प्रत्येकी 4 सामनावीराचे पुरस्कार पटकावले आहेत. (Photo: IPL/BCCI)

संजू सॅमसन आयपीएल 2026 चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने दहा सामन्यात 57.42 च्या सरासरीने 402 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)