कर्णधार गिलसोबत अगदी विराट कोहलीसारखंच घडलं, दुसऱ्यांदाच असं काही झालं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 7 गडी राखून पराभूत केलं. असंच काहीसं विराटसोबत घडलं होतं. भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं.

| Updated on: Oct 19, 2025 | 7:47 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या नेतृत्वाची भाकरी फिरवली. या दौऱ्याआधी रोहित शर्माचं कर्णधारपद काढून ते शुबमन गिलकडे देण्यात आलं. शुबमन गिलने वनडे कर्णधार म्हणून या दौऱ्यातून सुरुवात केली. पण पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo - BCCI Twitter )

2 / 5
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतील पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा 7 विकेट्सने पराभव झाला. या पराभवासह शुबमन गिलचा नको त्या पंगतीत समावेश झाला आहे. शुबमन गिलने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना गमावला आहे. (Photo - BCCI Twitter )

3 / 5
टी20 वर्ल्डकप 2024 नंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता. या संघाची धुरा शुबमनच्या खांद्यावर होती. या मालिकेतील पहिलाच सामना गमावला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टेस्ट कर्णधार म्हणून भूमिका बजावली. पण पहिल्याच सामन्यात पराभव झाला. आता वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभव झाला. (Photo - BCCI Twitter )

4 / 5
तिन्ही फॉर्मेटमधील पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारणारा शुबमन गिल हा भारताचा दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहलीसोबत असं घडलं होतं. कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर तिन्ही फॉर्मेटमध्ये पराभवाचं तोंड पाहीलं होतं. (Photo - BCCI Twitter )

5 / 5
शुबमन गिल जगातील नववा कर्णधार आहे की त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिला सामना गमावला आहे. दुसरीकडे, शुबमन गिल फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. त्याने 18 चेंडूत फक्त 10 धावा केल्या आणि बाद झाला. (Photo - BCCI Twitter )