IND vs ENG : शुबमन गिलचा विश्वविक्रम फक्त 27 धावांनी हुकला, जर तसं झालं असतं तर…

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजयापासून 7 विकेट दूर आहे. पण पावसाच्या स्थितीमुळे आता सामना ड्रॉ होऊ शकतो. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडने 3 गडी गमवून 72 धावा केल्या आहेत. अजूनही 536 धावांची आवश्यकता आहे.

| Updated on: Jul 06, 2025 | 4:13 PM
1 / 5
टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटी सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात 269 धावा करणाऱ्या गिलने दुसऱ्या डावात 161 धावांची खेली केली. या माध्यमातून त्याने एकाच सामन्यात 430 धावा केल्या आहेत.

2 / 5
एकाच सामन्यात 430 धावा करूनही शुबूमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करण्याची संधी हुकवली. फक्त 27  धावांनी त्याची संधी हुकली. कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ग्राहम गूच यांच्या नावावर आहे.

3 / 5
1990 मध्ये लंडनमधील लॉर्ड्स येथे भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ग्राहम गूचने पहिल्या डावात 333 आणि दुसऱ्या डावात 123 धावा केल्या. यामुळे त्याने एकाच सामन्यात 456 धावांचा विश्वविक्रम केला.

4 / 5
शुभमन गिलने पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा करून या विश्वविक्रमाजवळ पोहोचला होता. पण दुसऱ्या डावात 161 धावा करून बाद झाला. यासोबतच शुबमन गिलची वैयक्तिक धावसंख्या 430 इतकी झाली.

5 / 5
शुबमन गिलने दुसऱ्या डावात आणखी 27 धावा केल्या असत्या तर इतिहासात एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा ग्रॅहम गूचचा विश्वविक्रम (456) मोडू शकला असता. गिलचा विक्रम हुकला असला तरी कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)