अखेर रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 39 वर्षीय खेळाडूची कामगिरी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झिम्बाब्वेने जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. या विजयासह झिम्बाब्वेच्या स्टार खेळाडूने भारताची माजी कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 20, 2026 | 4:12 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत झिम्बाब्वेने अद्भूत कामगिरी केली आहे. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला बाहेर काढलं. त्यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमित पराभवाची धूळ चारली. श्रीलंकेला 6 विकेटने पराभूत केलं. आयसीसी स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्यांदाच श्रीलंकेला पराभूत केलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
झिम्ब्वावेच्या विजयात मोलाचा हातभार राहिला तो कर्णधार सिकंदर रझाचा.. सिकंदर रझाने 26 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 2 चौकार मारले. त्यासाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. इतकंच काय तर रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
आयसीसी स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने 37 वर्षे आणि 331 दिवसांचा असताना चॅम्पियन्स ट्रॉफीच सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. आता सिकंदर रझाने 39 वर्षे आणि 301 दिवसांचा असताना हा पुरस्कार मिळवला आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
सिकंदर रझाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. झिम्बाब्वेकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावारा खेळाडू ठरला आहे. तसेच स्पर्धेच्या इतिहासात संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
झिम्बाब्वेने पहिल्यांदाच सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वात हे यश मिळवलं आहे. आता या स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तगडे संघ जरी असले तरी झिम्बाव्बे उलटफेर करू शकते हे साखळी फेरीत दाखवलं आहे. त्यामुळे दिग्गज संघांना धास्ती असणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)