
वूमन्स टीम इंडियाची कर्णधार स्मृती मंधाना हीने मेन्स टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याच्याप्रमाणेच इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शतकाने केली. स्मृतीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात 28 जून रोजी खणखणीत शतक ठोकलं. स्मृतीने ट्रेंटब्रिजमध्ये 112 धावांची झंझावाती खेळी केली. स्मृती यासह टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या करणारी पहिली माहिला फलंदाज ठरली (Photo Credit : Getty Images)

स्मृतीने या सामन्यात 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीचं हे टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. स्मृती यासह वूमन्स टीम इंडियाकडून टी 20i शतक करणारी दुसरी फलंदाज ठरली. याआधी हरमनप्रीत कौर हीने 2018 साली 103 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci X Account)

मंधानाने या शतकासह ऐतिहासिक कामगिरी केली. मंधानाने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पहिली महिला फलंदाज हा बहुमान मिळवला. मंधानने याआधी वनडेत 11 तर कसोटीत 2 शतकं केली आहेत. तसेच स्मृती तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पाचवी महिला ठरली आहे. (Photo Credit : Bcci X Account)

तसेच स्मृती ट्रेंट ब्रिजमध्ये शतक करणारी पहिली महिला तर एकूण दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरली. स्मृतीआधी याच मैदानात टी 20i संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने 2022 साली शतक झळकावलं होतं. सूर्याने तेव्हा 117 धावांच खेळी केली होती. (Photo Credit : Bcci X Account)

स्मृतीने या खेळी दरम्यान 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. स्मृती यासह एका टी 20i सामन्यात सर्वाधिक 18 फटके लगावणारी पहिली भारतीय फंलदाज ठरली. स्मृतीनी हरमनप्रीत कौर हीचा (15) रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci X Account)