फाफ डुप्लेसिसने विराट कोहलीला मागे टाकत नोंदवला खास विक्रम

फाफ डुप्लेसिसने टी20 क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. नुकत्याच त्याने टी20 क्रिकेटमध्ये 11 धावांचा पल्ला गाठला आणि रेकॉर्ड नोंदवला. असं करताना त्याने टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीला मागे टाकले आहे. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण अफ्रिकेचा तिसरा खेळाडू आहे.

| Updated on: Jan 27, 2025 | 5:44 PM
1 / 6
दक्षिण अफ्रिका टी20 लीगच्या 22 व्या सामन्यात फाफ डुप्लेसिसने एका खास विक्रमाची नोंद केली. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्धच्या सामन्यात जॉबर्ग सुपर किंग्जकडून खेळताना टी20 क्रिकेटमध्ये 400 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.

2 / 6
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 399 सामने खेळले आहेत. तर फाफ डुप्लेसिसने आता 400 सामन्यांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू ठरला आहे. फाफच्या आधी दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलर (516) आणि इम्रान ताहिर (426) सामने खेळले आहेत.

3 / 6
टी20 क्रिकेटच्या इतिहासात 400 सामने खेळणारा फाफ डुप्लेसिस हा जगातील 22 वा खेळाडू ठरला आहे. फाफने दक्षिण आफ्रिका, आरसीबी, सीएसके, जेएसके यासह अनेक संघांसाठी 400 टी20 सामन्यांमध्ये 11102 धावा केल्या आहेत.

4 / 6
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 11102 धावा करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला आहे. या यादीत अव्वल स्थानी डेव्हिड मिलर आहे. टी20 क्रिकेटमध्ये 516 सामने खेळलेल्या मिलरने एकूण 11139 धावा केल्या आहेत.

5 / 6
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 399 सामने खेळले आहेत. यावेळी 382 डाव खेळणाऱ्या कोहलीने 9 शतके आणि 97 अर्धशतकांसह एकूण 12886 धावा केल्या आहेत. फाफ डुप्लेसिस सामन्यांच्या संख्येत पुढे असला तरी विराट कोहली धावांमध्ये पुढे आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याला आता जास्तीत जास्त लीग सामने खेळावे लागतील.

6 / 6
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने वेस्ट इंडिज, मुंबई इंडियन्स, त्रिनिदाद नाइट रायडर्ससह इतर संघांसाठी एकूण 694 सामने खेळले आहेत.