IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिकेतून 24 तासाच्या आत दोन खेळाडू आऊट, टीम इंडिया खूश!

भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टला होणार आहे. पण या मालिकेपूर्वी दोन खेळाडू स्पर्धेला मुकले आहे.

| Updated on: Aug 07, 2026 | 3:26 PM
1 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडियाला पथ्यावर पडणाऱ्या दोन बातम्या  मिळाल्या आहेत. (Photo: PTI)

2 / 5

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या दोन खेळाडू स्पर्धेतून आऊट झाले आहे. कुसल मेंडिस गॉल कसोटी सामना खेळणार नाही बातमी गुरूवारी आली होती. आता पाथुम निसंका देखील खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. (Photo: PTI)

3 / 5

कुसल मेंडिसला लंका प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. तर पाथुम निसंका धाव घेतला पडला आणि दुखापत झाली. त्यामुळे दोघंही कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

4 / 5

पाथुम निसंकाच्या मनगटला दुखापत झाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला मनगटात दुखापत जाणवत होती. त्यानंतर जुलै 2026 मध्ये पाथुमने लंडनमध्ये सर्जरी केली. त्यानंतर कमबॅकसाठी सज्ज होता. मात्र आता खेळणं कठीण आहे. (Photo: PTI)

5 / 5

दोन दिग्गज फलंदाज श्रीलंकन संघात नसल्याने मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे, दोन अनुभवी खेळाडू नसल्याने टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने 2-0 ने जिंकणं भाग आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us