
टीम इंडिया अनुभवी सलामीवीर गब्बर शिखर धवन याचा आज 5 डिसेंबर रोजी 38 वा वाढदिवस आहे. धवनने टीम इंडियासाठी अनेक अविस्मरणीय असे क्षण दिले आहेत. शिखर धवन याचा एक महारेकॉर्ड गेल्या 10 वर्षांपासून कायम आहे. बड्या बड्या फलंदाजांना धवनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयश आलं आहे.

िशखर धवन याने 10 वर्षांपूर्वी मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. धवनने पहिल्याच मॅचमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. धवनने कसोटी पदार्पणात वेगवान शतक ठोकण्याचा कारनामा केला होता.

शिखरने कसोटी पदार्पणात 85 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. धवनने पदार्पणात वेगवान शतक करत वेस्ट इंडिजच्या ड्वेन स्मिथ याचा विक्रम मोडीत काढला होता. ड्वेन स्मिथ याने 98 चेंडूत शतक केलं होतं.

शिखरने 16 मार्च 2013 रोजी कांगारुं विरुद्ध 174 बॉलमध्ये 187 धावा केल्या. धवनने या खेळीत 33 चौकार आणि 2 सिक्स लगावले.

धवनने टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच काही वेळा नेतृत्वही केलंय. धवनने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 315, 167 एकदिवसीय सामन्यात 6 हजार 793 आणि 68 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार 759 धावा केल्या आहेत.