
टीम इंडियाने बुधवारी 22 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्याने आतापर्यंत सार्थपणे टी 20i मध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. या निमित्ताने टीम इंडियाचे टॉप 5 यशस्वी कर्णधारांबाबत जाणून घेणार आहोत. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

यशस्वी कर्णधारांच्या यादीत टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी आहे. हार्दिकने टीम इंडियाचं 16 टी 20 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. त्यापैकी भारताने 10 सामने जिंकलेत. तर 5 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 1 मॅच टाय झाली. (Photo Credit : Hardik Pandya X Account)

भारताचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव या मानाच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. सूर्याने टीम इंडियाचं आतापर्यंत 18 सामन्यात कर्णधारपद सांभाळलं आहे. सूर्याने त्यापैकी 14 सामन्यात भारताला विजयी केलं आहे. तर फक्त 3 वेळाच पराभूत व्हावं लागलंय. तर एकमेव सामना हा टाय झालाय. सू्र्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज 'रनमशीन' विराट कोहली हा तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 50 सामन्यांत कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्यापैकी भारताने 30 सामने जिंकले तर 16 गमावले. तसेच 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर 2 मॅच टाय झाल्या. (Photo Credit : Virat Kohli X Account)

टीम इंडियाला पहिलाच टी 20i वर्ल्ड कप जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंह धोनीने भारताचं 72 टी 20i सामन्यांत नेतृत्व केलं. त्यापैकी भारताने 41 वेळा विजय मिळवला. तर 28 वेळा प्रतिस्पर्धी संघाने मात केली. तर 1 मॅच टाय झाली. तर 2 सामन्यांचा निकालच लागू शकला नाही. (Photo: MI News/NurPhoto via Getty Images)

रोहित शर्मा याने टीम इंडियाला 2024 मध्ये दुसरा टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहित टीम इंडियाचा सर्वात यशस्वी टी 20i कॅप्टन आहे. रोहितने धोनीच्या तुलनेत कमी सामन्यात नेतृत्व केलं, मात्र त्यानंतरही हिटमॅनने भारताला सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवून दिला. रोहितच्या नेतृत्वात भारताने 62 पैकी 49 सामने जिंकले. तर फक्त 12 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर फक्त एकमेव मॅच टाय झाली. (Photo Credit : Suryakumar Yadav X Account)