
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात केएल राहुलने निर्णायक भूमिका बजावली. (Photo Credit : K L Rahul X Account)

केएलने निर्णायक क्षणी महत्त्वाची खेळी केली. केएलने गरजेच्या क्षणी महत्त्वाची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरण्यात मोठी भूमिका बजावली. तसेच स्टंपमागूनही चांगली कामगिरी केली. त्यानंतर केएलने आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (Photo Credit : K L Rahul X Account)

केएल राहुल याने त्याची पत्नी आथिया शेट्टीसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतून आथिया आणि केएल लवकरच पहिल्यांदा आई-बाबा होणार असल्याचं स्पष्ट झालंय. (Photo Credit : K L Rahul X Account)

केएलने पत्नी आथियासोबतचे काही खास फोटो एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आथियाने या फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. (Photo Credit : K L Rahul X Account)

केएलने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे. (Photo Credit : K L Rahul X Account)