
यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत धमाका केला आहे. यशस्वीने सलग 2 द्विशतकांसह इंग्लंडला गुडघे टेकायला भाग पाडलं आहे.यशस्वीने आतापर्यंत या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये 545 धावा केल्या आहेत.

यशस्वीचा आझाद मैदान ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यशस्वी आझाद मैदानातील तंबूत झोपायचा. मात्र यशस्वीने क्रिकेटच्या जोरावर 5 बीएचके घर घेतलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वीचं ठाण्यात 1500 स्केवअर फुट इतकं मोठं घर आहे. यशस्वी गेल्या वर्षी कुटुंबियांसोबत तिथे शिफ्ट झाला.

यशस्वीने नव्या घरात शिफ्ट होताच काही फोटो शेअर केले होते. यशस्वीच्या घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

यशस्वीच्या या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश आहे. किचन एरिया अफलातून आहे. तर मास्टर बेडरुमसह बाथटबही जोडून आहे.

यशस्वीने टी 20 आणि टेस्टमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यशस्वीने आतापर्यंत 861 कसोटी आणि 502 टी 20 धावा केल्या आहेत.

यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली. यशस्वीने 14 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकासह 625 धावा केल्या होत्या. या आधारावर त्याला टीम इंडियात संधी मिळाली.

यशस्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्येही धमाकेदार कामगिरी केली आहे. यशस्वीने 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2 हजार 706 धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये यशस्वीने 32 सामन्यात 1 हजार 511 धावा केल्या आहेत.