
टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा होती. मात्र या दोघांमध्ये खटके उडाल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वी आणि निधी दोघे गेल्या काही काळापासून एकमेकांचे फोटो शेअर करत होते. त्यानंतर दोघेही रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.

पृथ्वी आणि निधी या दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निधी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. निधीचे इस्टांवर 100 k पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

पृथ्वी आणि निधी न्यू इअर सेलिब्रेशनलाठी एका पबमध्ये गेले होते. तेव्हा हे दोघेही स्पॉट झाले होते. इतकंच काय, निधी आयपीएल 16 व्या मोसमातील सामना पाहण्यासाठी पोहचली होती.

पृथ्वी निधीआधी अभिनेत्री प्राची सिंह हीला डेट करत होता. पृथ्वी आणि प्राची रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र इथेही दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं.