
शाहीन आफ्रिदी आणि अंशाने 3 फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नात जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आता लग्न सोहळ्यासह ग्रँड रिसेप्शन देण्यात आलं. अंशा ही शाहीद आफ्रिदीची मुलगी आहे.

शाहीन आणि अंशा एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते. पण ओळखीचं रुपांतर प्रेमात होण्यास बराच कालावधी गेला आणि आता लग्न झालं.

एका इंटरव्ह्यूमध्ये शाहीन सांगितलं होतं की, लाला (शाहीद आफ्रिदी) आणि माझा भाऊ मित्र आहेत. आमच्या घरची मंडळीही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. माझ्या आईने लग्नाचा प्रस्ताव पुढे केला आणि दोन्ही कुटुंबाने होकार दिला.

"आमची पहिली भेट कधी झाली हे आठवत नाही. लग्न करण्याच्या हेतूने आम्ही कधीच भेटलो नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या घरी जात होतो आणि बघत होतो. नंतर थेट आम्ही लग्नात भेटलो.", असं शाहीन आफ्रिदी म्हणाला.

"आपल्या जवळ कायम असा जोडीदार असावा जो स्तुती करेल. नशिबाने माझ्याकडे असा जोडीदार आहे. ती कोणत्याही गोष्टीत सहभागी होत नाही. पण कायम मला सपोर्ट करते.", असंही शाहीन आफ्रिदीने पुढे सांगितलं.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरीदी याने आपली पत्नी अंशासोबत दुसऱ्यांदा विवाह केला. यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात कर्णधार बाबर आझम आणि इतर खेळाडूंनी हजेरी लावली. या लग्नाचे फोटो आता व्हायरल होत आहेत.