भारत श्रीलंका कसोटी मालिकेनंतर BCCIची बैठक, अजित आगरकरबाबत काय निर्णय घेणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना असून असताना बीसीसीआयच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे. या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित आगरकर मुख्य समिती अध्यक्षपदी राहणार की जाणार? यावर चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या पुढच्या कारकिर्दीचा निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआय अधिकार अजित आगरकर यांच्यासोबत एक बैठक घेण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बैठकीचा मुख्य मुद्दा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षांनी वाढवण्याचा विचार केला जात आहे. (Photo: PTI)

भारतीय संघाचे मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पण नियमानुसार, एक वर्षांचा कार्यकाळ वाढवला वाढवला जाऊ शकतो. या नियमानुसार, अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

अजित आगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा मुख्य हेतू म्हणजे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा.. आयसीसी या स्पर्धेपर्यंत अजित आगरकर यांना या पदावर कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. (Photo: PTI)

रिपोर्टनुसार, रोहित शर्माच्या भविष्याबाबत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात बैठक होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मागच्या वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारून शुबमन गिलकडे सूत्र सोपवली होती. (Photo: PTI)