
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाच संघ एक गट तयार केला आहे. असे एकूण चार गट तयार केले आहेत. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. भारता पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. भारता पाकिस्तान असलेल्या गटात नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे संघ आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानला सुपर 8 फेरीची संधी आहे. .साखळी फेरीत दोन्ही संघ टॉपला राहीले तर सुपर 8 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील. (Photo- Asian Cricket)

सुपर 8 फेरीत जर दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या टॉप 4 मध्ये राहिले तर मीफायनलमध्ये एकमेकांशी भिडू शकतात. याचा अर्थ असा की जर भारत सुपर 8 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर राहिला तर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. (Photo- Asian Cricket)

उपांत्य फेरीत गणित चुकलं आणि भारत पाकिस्तान वेगवेगळ्या संघाशी लढले. या सामन्यात दोन्ही संघांचा विजय झाला तर अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील. आता हे गणित जुळलं तर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अवघ्या 29 दिवसांत तीन हाय-व्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळेल. (Photo- Asian Cricket)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना कोलंबोत होणार आहे. कारण पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत पाकिस्तान साखळी फेरीतील सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल. (Photo- Asian Cricket)