
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात 15 खेळाडू या हिशेबाने 150 खेळाडू असणार आहे. यात काही वयस्कर खेळाडू देखील आहेत.

नेदरलँडचा यष्टिरक्षक फलंदाज वेस्ली बॅरेसी हा या विश्वचषकात भाग घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याचं वय 39 वर्षे असून बरेसी नेदरलँड्सकडून खेळण्यासाठी सज्ज आहे.

अफगाणिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा देखील स्पर्धेतील वयस्कर खेळाडू आहे. नबीचे सध्याचे वय 38 वर्षे 271 दिवस आहे.

बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज महमदुल्लाचं वय 37 वर्षे 237 दिवस आहे. आता संघात स्थान मिळवले आहे.

आर अश्विन हा या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. वयाच्या 37 व्या वर्षी रविचंद्रन अश्विन याला अक्षर पटेलच्या जागी स्थान मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता 36 वर्ष आणि 337 दिवसांचा आहे. तसेच वॉर्नर वर्ल्डकपनंतर क्रिकेटला रामराम ठोकेल अशी चर्चा आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली वयाच्या 36 वर्षे आणि 103 दिवसांचा आहे. मोईन अलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे.

दिमुथ हा श्रीलंकेकडून खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. 35 वर्षीय दिमुथ करुणारत्नेने यावेळी लंकन संघात स्थान मिळवले आहे.

टीम साऊदी हा न्यूझीलंड संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. 34 वर्षे आणि 292 दिवसांचा असलेल्या साऊदीला यावेळी विश्वचषकात चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.

रॅसी व्हॅन डर डुसेन हा दक्षिण आफ्रिका संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. त्याचे सध्याचे वय 34 वर्षे 234 दिवस आहे.

इफ्तिखार अहमद हा पाकिस्तान संघात स्थान मिळवणारा वयस्कर खेळाडू आहे. पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजाचे सध्याचे वय 33 वर्षे 26 दिवस आहे.