
आयपीएल प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातही मनोरंजक माहिती आहे. आतापर्यंत तीन संघांना पहिला सामना खेळता आलेला नाही.

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत सर्वाधिकवेळा पहिला सामना खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. पण तीन संघांना पहिला सामना खेळता आलेला नाही.

आयपीएलची आतापर्यंत 16 पर्व पार पडले आहेत. पण पंजाब किंग्सने एकदाही पहिला सामना खेळलेला नाही. 2014 मध्ये पंजाब किंग्स संघाने अंतिम फेरी गाठली होती. ण 2015 च्या परव्ता पहिला सामना खेळला नाही.

आयपीएलचं पहिलं पर्व जिंकण्याचा मान राजस्थान रॉयल्सला मिळाला होता. त्यानंतर 14 पर्व खेळलेल्या राजस्थानला पहिला सामना खेळता आला नाही. 2022 मध्ये राजस्थानने अंतिम फेरी गाठली होती. पण 2023 मध्ये ओपनिंग सामना खेळता आला नाही.

लखनौ सुपर जायंट्स संघाने 2022 आयपीएल पर्वाद्वारे स्पर्धेत एन्ट्री मारली. पण या संघाने आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात उद्घाटन सामना खेळला नाही. या तीन संघांव्यतिरिक्त बाकीच्या संघांनी आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यात खेळले आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पहिला सामना खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स नवव्यांदा उद्घाटनाचा सामना खेळण्याच्या तयारीत आहे. तर मुंबई इंडियन्सने 8 वेळा, तर कोलकाता नाईट रायडर्सने 6 वेळा पहिला सामना खेळला.