
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना टिम साउदीने दुसऱ्या डावात सलग दोन षटकार मारत अनोखा विक्रम नोंदवला आहे.

दुसऱ्या डावात नवव्या स्थानावर उतरत टिम साउदीने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 34 धावा केल्या. दोन षटकारांसह कसोटी खेळणाऱ्या 9 संघांविरुद्ध षटकार मारण्याचा दुर्मिळ विक्रम केला आहे.

टिम साउदीने 95 कसोटी सामने खेळले आहेत. यात एकूण 85 षटकार मारले आहेत. 77 ही साउदीची सर्वोत्तम खेळी आहे. इंग्लंडविरुद्ध 25, भारताविरुद्ध 15 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 षटकार मारले आहेत.

टिम साउदीने पाकिस्तानविरुद्ध 10 षटकार, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 9 षटकार मारले. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 2 षटकार ठोकले आहेत. याशिवाय झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम साऊदीला 1 षटकार ठोकण्यात यश आले आहे.

टिम साउदीने 95 कसोटी सामन्यात एकूण 372 गडी बाद केले आहेत. 64 धावांवर 7 गडी बाद करण्याची सर्वोत्तम खेळी आहे. 15 वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.