Odi Cricket : वनडेत वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम कुणाच्या नावावर? पाहा टॉप 5 मध्ये कोण कोण
Fastest to 100 wickets in ODIs : टीम इंडियाकडून वेगवान 100 वनडे विकेट्स घेण्याचा विक्रम हा मोहम्मद शमी याच्या नावावर आहे. शमीने 56 सामन्यांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं.

नेपाळचा गोलंदाज संदीप लामिछाने याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. संदीपने 42 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. संदीपने 2023 साली ही कामगिरी केली होती. (Photo Credit : AFP)

अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशिद खान या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. राशिदने 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. राशिदने 2018 साली विंडीज विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा शेकडा पूर्ण केला होता. (Photo Credit : PTI)

ओमानचा बिलाल खान तिसऱ्या स्थानी आहे. बिलाल खान याने नामिबिया विरुद्ध 2024 साली 100 वनडे विकेट्स पूर्ण केल्या होत्या. बिलालने 49 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : ICC)

पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी वनडेत वेगवान 100 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. शाहीनने 51 व्या सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क वनडेत वेगवान 100 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. स्टार्कने कारकीर्दीतील 52 व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : Getty Images)