
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 3 एप्रिल 2013 रोजी पुणे वॉरियर्स विरुद्ध ही खेळी केली होती. गेलने अवघ्या 30 चेंडूत शतक केलं होतं. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज आहे. वैभवने सोमवारी 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावलं. राजस्थान रॉयल्स टीमच्या या 14 वर्षीय युवा फलंदाजाने या शतकी खेळीसह युसूफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Ipl X Account)

वैभवआधी आयपीएलमध्ये भारताकडून वेगवान शतक करण्याचा विक्रम गेल्या 15 वर्षांपासून यूसुफ पठाण याच्या नावावर होता. मात्र आता वैभवने युसूफला मागे टाकलं आहे. त्यामुळे यूसुफची तिसर्या स्थानी घसरण झाली आहे. यूसुफने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 13 मार्च 2010 रोजी 37 चेंडूत शेकडा पूर्ण केला होता. युसूफने मुंबई इंडियन्स विरुद्ध ही झंझावाती खेळी केली होती. (Photo Credit : rajasthanroyals X Account)

डेव्हिड मिलर या यादीत चौथ्या स्थानी आहे. मिलरने 6 मे 2013 रोजी 38 चेंडूत शतकी खेळी केली होती. मिलरने तेव्हा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo Credit : PunjabKingsIPL X Account)

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड पाचव्या स्थानी आहे. हेडने 15 एप्रिल 2024 रोजी सनरायजर्स हैदराबादसाठी शतक झळकावलं होतं. हेडने 39 चेंडूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध धमाकेदार शतक केलं होतं. (Photo Credit : Ipl X Account)