Cricket Awards: ट्रेव्हिस हेडच्या शिरपेचात सलग दुसऱ्यांदा मानाचा तुरा, या तीन खेळाडूंचाही सन्मान
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी मागच्या एका वर्षात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्काराने गौरविण्यात आलं. यंदाही सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ट्रेव्हिस हेडची निवड झाली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने क्रिकेट पुरस्काराची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात देशासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेडने मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या जोरावर एलन बॉर्डर मेडल पटकावलं. (फोटो-GETTY IMAGES)

एलन बॉर्डर मेडल हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. मागच्या वर्षीही ट्रेव्हिस हेडला हा पुरस्कार मिळाला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. (फोटो-GETTY IMAGES)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सन्मानित करण्यात आलं. त्याने 11 कसोटी सामन्यात एकूण 57 विकेट घेतल्या. यावेळी त्याची सरासरी जवळपास 18.12 ची होती. एशेज कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या. त्या मालिकेत प्लेयर ऑफ द सीरिजचा मानकरीही ठरला होता. (फोटो-GETTY IMAGES)

वनडे फॉर्मेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अष्टपैलू मिचेल मार्श याचा सन्मान करण्यात आला. मार्शने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान दिलं होतं. त्याच्या या कामगिरीसाठी गौरव करण्यात आला. (फोटो-GETTY IMAGES)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी यंदाचा मानकरी ठरला तो टिम डेविड.. डेविडने टी20 सामनयात आक्रमक खेळी करत चाहते आणि निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियन संघाला टी20 फॉर्मेटमध्ये विजयाची चव चाखण्यासठी मदत केली. (फोटो-GETTY IMAGES)