वैभव सूर्यवंशी वयाच्या 14 व्या वर्षी उपकर्णधार, 2026 वर्ल्डकपपूर्वी घेतला असा निर्णय

वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे. 14व्या वर्षीच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आता वैभव सूर्यवंशी एक नवी जबाबदारी पेलण्यास सज्ज झाला आहे. त्यांच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

| Updated on: Oct 13, 2025 | 6:02 PM
1 / 5
वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये नवे अध्याय लिहिण्यास सुरुवात केली आहे. वैभव सूर्यवंशीची बॅट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगलीच चालली. त्यामुळे लांबचा पल्ला गाठेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर रणजी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. 15 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी बिहारचा उपकर्णधार असेल. (Photo: Andy Kearns/Getty Images)

2 / 5
वैभव सूर्यवंशीने बिहारसाठी आतापर्यंत पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहे. त्याने दहा डावात 158 चेंडूंचा सामना केला आणि 100 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. पण आता वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पहिल्यांदाच बिहारच्या रणजी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
वैभव सूर्यवंशी या पर्वात बिहारकडून सहावा प्रथम श्रेणी सामना खेळणार आहे. या पर्वात किती सामने खेळणार यावर हा आकडा वाढत जाईल. दुसरीकडे, बिहारच्या कर्णधारपदी साकिबुल गनी यांची निवड झाली आहे. बिहारचा पहिला सामना पाटण्यातील मोईन-उल-हक स्टेडियमवर अरुणाचल प्रदेशशी होईल. त्यानंतर दुसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी मणिपूरविरुद्ध होईल. (Photo: PTI)

4 / 5
वैभव सूर्यवंशी या रणजी स्पर्धेत पूर्ण पर्व खेळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण पुढच्या वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे 2026 अंडर 19 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी त्यावर लक्ष केंद्रीत करेल. (Photo: PTI)

5 / 5
बिहार संघ : पीयूष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशू सिंग, सचिन कुमार सिंग, खलिद सिंह, अर्णव किशोर. (Photo: PTI)