
आशिया कप 2025 स्पर्धा सुरु असून भारतीय संघाने दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग 11 मध्ये वरुण चक्रवर्ती होता. वरुणने दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेटही चांगला आहे. वरुण चक्रवर्ती पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी करतो. असं असताना वरुण चक्रवर्तीला आनंदाची बातमी मिळाली आहे. (Photo- PTI)

वरुण चक्रवर्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वरुण चक्रवर्तीला जगातील नंबर 1 टी20 गोलंदाज होण्याचा मान मिळाला आहे. वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडच्या जेकब डफीला मागे टाकले आहे.वरुण चक्रवर्ती 733 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (Photo- PTI)

वरुण चक्रवर्ती हा टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर 1 होणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी ही कामगिरी केली आहे.आता रवी बिश्नोई हा आठव्या क्रमांकावर आहे. तर अक्षर पटेल बाराव्या स्थानावर आहे. (Photo- PTI)

34 वर्षीय वरुण चक्रवर्तीने 2021 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 20 टी20 सामने खेळले आहेत आणि 35 विकेट्स घेतल्या आहेत. टी20क्रिकेटमध्ये त्याचा इकोनॉमी रेट फक्त 6.83 इतका आहे. त्याने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. (Photo- PTI)

दुबई आणि अबूधाबीमधील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल आहेत. त्यामुळे त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. साखळी फेरीत शेवटचा सामना ओमानसोबत होईल. तसेच सुपर चार फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना होऊ शकतो. (Photo- PTI)