
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलआधी अपात्र ठरवणं आणि त्यानंतर अचानक जाहीर केलेली निवृत्ती यामुळे विनेश फोगाटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विनेश फोगाटच व्यक्तीगत जीवन कसं आहे? तिचे पती कोण आहेत? या बद्दल जाणून घ्या.

विनेश फोगाटच्या नवऱ्याच नाव सोमवीर राठी आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात राहणार सोमवीर सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू राहिलेला आहे.

विनेशने 2018 साली सोमवीर बरोबर लग्न केलं. खास बाब म्हणजे दोघांनी लग्नात 7 नाही तर 8 फेरे घेतले होते. लग्नातील 8 वा फेरा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ'ला समर्पित होता.

लग्नाआधी विनेश आणि सोमवीरची ओळख होती. 7 वर्षांपासून दोघे परस्परांना ओळखत होते. फक्त ओळखतच नव्हते, तर त्यांच्या नात्यात प्रेमही होतं. इंडियन रेल्वेमध्ये नोकरी करताना 2011 साली विनेश आणि सोमवीरची पहिली ओळख झाली. आधी मैत्री झाली, पुढे हे नातं प्रेमात कसं बदललं हे दोघांनाही नाही समजलं.

सोमवीरने विनेशला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रपोज केलं होतं. विनेश इंडोनेशिया येथे एशियन गेम्समध्ये मेडल जिंकून परतलेली त्यावेळी सोमवीरने तिला प्रपोज केलेलं.