
Virat Kohli new record

गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीने या मैदानावर अनेक आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 कसोटी सामने खेळला आहे. आणि त्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. कोहलीने या मैदानावर केवळ 4 डाव खेळले असून त्याची 60 पेक्षा जास्त सरासरीने 181 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)

या मैदानावर कोहलीने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. चिन्नास्वामी येथे त्याने पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावलं होतं. टीम इंडियात नव्याने ओळख झालेल्या कोहलीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे आणि भारतातील पहिले शतक ठरले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 51 धावा केल्या. (Photo: AFP)

श्रीलंकेविरुद्धचा आगामी सामना डे-नाईट आहे आणि गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. कसोटीचा विचार केला तर कोहलीच्या बॅटने येथेही मोठी मजल मारली आहे. विराट कोहली भारतासाठी डे-नाईट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने एक शतक आणि अर्धशतकांसह एकूण 241 धावा केल्या आहेत. ((Photo: PTI)