
विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेत 15 वर्षानंतर विराट कोहली खेळण्यास उतरला आहे. दिल्लीकडून खेळताना त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध एक धावा करताच त्याने एक मैलाचा दगड गाठला आहे. (Photo- PTI)

आंध्र प्रदेशविरुद्ध विराट कोहलीने एक धाव घेतली आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यापूर्वी विराट कोहलीचे 15999 धघावा होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशविरुद्धच्या 330 व्या लिस्ट ए डावात विराटने आपला 16 हजार धावा पूर्ण केल्या. (Photo- PTI)

लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावा करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकरने 343 व्या सामन्यात हा कारनामा केला आहे. यासह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावा करणारा पहिला फलंदाज आहे. (Photo- PTI)

विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत शेवटचा सामना 2010-2011 मध्ये खेळला होता. 15 वर्षानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीत खेळला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि 2027 वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी त्याला या स्पर्धेत खेळणं आवश्यक आहे. (Photo- PTI)

विराट कोहलीने शतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला संकटातून तारलं आहे. आंध्र प्रदेशने विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं आहे. संघाची 1 धाव असताना पहिला धक्का बसला होता. त्याने विराट कोहलीने प्रियांश आर्य आणि नितीश राणासोबत डाव सावरला. (Photo- PTI)